Fri, May 24, 2019 20:35होमपेज › Goa › मुकेश अंबानींच्या मुलाचे गोव्यात प्री एंगेजमेंट शुट 

मुकेश अंबानींच्या मुलाचे गोव्यात प्री एंगेजमेंट शुट 

Published On: Mar 25 2018 10:13AM | Last Updated: Mar 25 2018 10:13AMपणजी : पुढारी ऑनलाईन

रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याचा प्री एंगेजमेंट सोहळा शनिवारी पार पडला. आकाश याचा साखरपुडा हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहतासोबत  होणार आहे. परंतु, त्यापूर्वी गोव्यात प्री एंगेजमेंट फोटोशूट करण्यात आले.

Image may contain: 2 people, people smiling, stripes and close-up

मुकेश अंबानी यांच्या कुटुंबासह त्‍यांचे जवळचे पाहुणे आणि मेहता कुटुंबीयांच्या उपस्थित आकाश आणि श्लोकाचा प्री एंगेजमेंट सोहळा पार पडला. कार्यक्रमानंतर फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आले.

Image may contain: 2 people, people smiling, people standing and outdoor

मुकेश अंबानी यांची सून श्लोका हिने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अमेरिकेतील प्रिंस्टन युनिव्हर्सिटीत अँथ्रोपोलॉजी म्‍हणजे मानववंशशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून लॉची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती वडील  रसेल मेहता  यांच्या हिऱ्याच्या कंपनीत संचालक म्‍हणून काम पाहात आहे. तसेच ती ‘कनेक्ट फॉर’ या संस्थेची संस्थापक असून, ही संस्‍था इतर सामाजिक संस्‍थांना मदत करते. 

Image may contain: 3 people, people smiling, people standing, sky and outdoor