Wed, Jul 17, 2019 20:03होमपेज › Goa › मंत्री आजगावकर, पालयेकरांकडून  केरळ पूरग्रस्तांसाठी महिन्याचे वेतन

मंत्री आजगावकर, पालयेकरांकडून  केरळ पूरग्रस्तांसाठी महिन्याचे वेतन

Published On: Aug 20 2018 1:36AM | Last Updated: Aug 19 2018 11:50PM
पणजी : प्रतिनिधी

पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर आणि जलेस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी केरळातील पुरात सापडलेल्या लोकांसाठी एका महिन्याचे वेतन मदतनिधीसाठी देण्याचे घोषित केले. पर्यटनमंत्री आजगावकर यांनी शनिवारी एक महिन्याचे वेतन केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे जाहीर केल्यावर त्यांचे अनुकरण करणारे विनोद पालयेकर हे दुसरे मंत्री ठरले आहेत. आजगावकर यांनी आपल्या अन्य सहकारी मंत्र्यांना आणि गोमंतकीयांनाही केरळच्या आपद्ग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते.

आजगावकर यांनी आपल्या ट्विटर  संदेशात म्हटले आहे की, केरळचे पुरामुळे झालेले भयंकर नुकसान पाहून अतिव दुःख झाले. मदतनिधीसाठी आपल्यातर्फे एका महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर करत आहे. केरळमधील आपल्या बांधवांच्या  हालअपेष्टा पाहून आपण विचलित झालो. त्यांचे पुर्नवसन आणि मदतकार्यास आपल्यातर्फे लहानसेे योगदान देत आहे, असे मंत्री पालयेकर यांनी रविवारी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे जाहीर केले.