Fri, Jul 19, 2019 07:17होमपेज › Goa › दक्षिण गोव्यात दाखल; राज्यात आज अतिवृष्टीचा इशारा

मान्सून आला रे...

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 12:40AMपणजी : प्रतिनिधी  

राज्यात गुरुवारी मान्सूनचे आगमन झाले असून उत्तर गोव्यात 24  तासांत मान्सून दाखल होईल. गोवा वेधशाळेने रेड अलर्ट जारी करून 8 जून रोजी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार दिवसांत मान्सून राज्यभरात सक्रिय होईल, अशी माहिती गोवा वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली.  

साहू म्हणाले की, मान्सून गोव्यात पोचला असून दक्षिण गोव्यात दाखल झाला आहे. पुढील 24 तासांत उत्तर गोव्यातही मान्सून हजेरी लावेल. पुढील पाच दिवसांत राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. मात्र, शुक्रवारी (दि.8) अतिवृष्टीची शक्यता आहे. 9 आणि 10 जून रोजी काही भागांत जोरदार पाऊस असेल तर 11 जून रोजी राज्यभरात मान्सून सक्रिय होईल. यंदा मान्सूनचा पाऊस 95 टक्के पडेल असा अंदाज आहे. 

राज्यात गुरूवारी विविध ठिकाणी पाऊस पडला. गेल्या 24 तासांत काणकोण येथे 2 इंचाहून अधिक पाऊस झाला. दाबोळी येथे 1 इंच पावसाने हजेरी लावली. फोंडा, सांगे व एला (जुने गोवे) भागातही जोरदार पाऊस होता.