होमपेज › Goa › अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पोलिसास ७ दिवस कोठडी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पोलिसास ७ दिवस कोठडी

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 19 2018 1:15AMदाबोळी : प्रतिनिधी

सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे दोघांनी अपहरण करून बलात्कार केल्याची तक्रार शनिवारी (दि.16) रात्री उशिरा वास्को पोलिसांत दाखल झाली होती. या प्रकरणी सिद्धार्थ गोसावी या पोलिस कॉन्स्टेबलसह अल्पवयीनास अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल गोसावीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, अल्पवयीन संशयितास अपनाघरमध्ये पाठवण्यात आले आहे.दरम्यान, वास्को उपअधीक्षकांच्या कार्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल संशयित गोसावी याला सोमवारी सेवेतून निलंबित करण्यात आले.

पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री वास्को पोलिस स्थानकात पीडित युवतीने तक्रार दाखल केली. या तक्रारीत तिने मूळ बिहारचा असलेल्या अल्पवयीन मुलाने तिचे अपहरण करून झुवारीनगर येथील एका खोलीत बलात्कार केला होता. त्यानंतर 13 जून रोजी वास्को रेल्वे स्थानकावरून पोलिस कॉन्स्टेबल सिध्दार्थ गोसावी व त्याच्या अल्पवयीन  मित्राने आपल्या वाहनातून अपहरण करून एका नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला होता.त्यानंतर 14 रोजी घरी सोडतो असे सांगून फोंडा येथील अज्ञातस्थळी नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिने आरडाओरड केली असता तिला सिध्दार्थने मारहाण केल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे.