Wed, Jul 17, 2019 20:37होमपेज › Goa › प्रादेशिक आराखड्यातील चुकीसाठी कोलवा चर्च पाडू देणार नाही

प्रादेशिक आराखड्यातील चुकीसाठी कोलवा चर्च पाडू देणार नाही

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 11 2018 1:19AMमडगाव : प्रतिनिधी

जुन्या प्रादेशिक आराखड्यात अनेक चुका झालेल्या आहेत.कोलवा चर्च पूर्वजांनी सांभाळून ठेवलेले एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून प्रादेशिक आराखड्यातील चुकीसाठी चर्च पाडू देणार नाही. सोळा ऑगस्ट रोजी अरखड्यातून हा वादग्रस्त रस्ता वगळून टाकला जाईल, असे आश्वासन नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दिले आहे.

कोलवा चर्चच्या सभागृहात या वादग्रस्त रस्त्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.2021 च्या  प्रादेशिक आराखड्यात एक मुख्य रस्ता कोलवा चर्च वरून गेल्याचे दाखविण्यात आले होते.नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी स्वत: येऊन या विषयी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी लोकांनी केली होति. त्यामुळे त्यावर चर्चा करण्यासाठी ही जाहीर सभा बोलाविण्यात अली होती. यावेळी स्थानिक आमदार चर्चिल अलेमाव, कोलवा चर्चचे साजे फादर फा.सिम्प्लिसियानो,कोलवाचे पंचायत सदस्य व इतर उपस्थित होते. सुमारे दीड हजार लोक आणि बिगरसरकारी संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.प्रदेशिक आराखड्यात अनेक चुका झालेल्या आहेत. पण हा प्रादेशिक आराखडा आपण तयार केला नव्हता हे दुसर्‍याच कोणाचे पिल्लू होते.आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रदेशील आराखड्यात झालेल्या चुकी विषयी माहिती दिल्यास आपण स्वतः त्या मतदारसंघात येऊन चर्चा करण्यास आणि त्यावर उपाय काढण्यास तयार आहे, असे आश्वासन मंत्री सरदेसाई यांनी दिले.

विधानसभा अधिवेशनात आणलेल्या दुरुस्ती विधेयकावरून आपल्यावर बरीच टीका झाली. त्या विधेयकाला समर्थन दिले म्हणून चर्चिल अलेमाव यांच्यावर देखील टीका झाली पण ते दुरुस्ती प्रादेशिक आराखड्यातील चुकीची दुरुस्ती करण्याबाबत आणला होता, असे सरदेसाई यांनी सांगितले.प्रादेशिक आराखड्यात अनेक चुका झालेल्या आहेत. शेतातून रस्ते दाखविण्यात आले आहेत,जिथे लहान रस्ता गरजेचा होता तिथे मोठा रस्ता दाखवण्यात आलेला आहे आणि जिथे रस्त्याची गरज होती तिथे रस्ताच दाखवण्यात आलेला नाही. कृषी जमिनी सेटलमेंट झोन म्हणून दाखविण्यात आलेले आहेत. या सर्व चुका दुरुस्त केल्या जातील. कोलवा चर्च आणि लोकांची घरे पाडली जाणार नाहीत. त्यासाठी सोळा ऑगस्ट रोजी हा वादग्रस्त रस्ता आराखड्यातील नकाशातून रद्द केला जाईल, असे आश्वासन सरदेसाई यांनी दिले आहे. गोयकरांचे हित राखणे हे आपले कर्तव्य आहे आहे. दुरुस्ती विधेयकाला दिलेल्या पाठिंब्या साठी चर्चिल अलेमाव यांना सरकार विसरू शकणार नाही, असे सांगून त्यांनी चर्चिल यांचे आभार व्यक्त केले.

चर्चिल आलेमाव यांनी  लोकांच्या भल्यासाठी दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला आहे. चर्च चा विषय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमोर मांडण्यात आलेला आहे. मंत्री विजय सरदेसाई यांनी हा वादग्रस्त रस्ता आराखड्यातून रद्द् करून आपला शब्द पाळावा, अशी मागणी त्यांनी केली.फादर सिम्प्लिसीयन यांनी यावेळी बोलताना पूर्वजांनी राखून ठेवलेली ही चर्च कोणत्याही अवस्थेत पाडू देऊ नये. गरज पडल्यास प्राणांची आहुती देऊ. 

यावेळी फादर सिम्प्लिसीयन यांनी  मंत्री सरदेसाई यांना निवेदन सादर केले.