Tue, Jun 18, 2019 20:20होमपेज › Goa › मंत्री सुदिन ढवळीकर राज्यात परतले 

मंत्री सुदिन ढवळीकर राज्यात परतले 

Published On: Jul 17 2018 1:33AM | Last Updated: Jul 16 2018 11:21PMपणजी : प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांचे मुंबईहून राज्यात सोमवारी (दि.16) रात्री उशिरा आगमन झाले. ते विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाग घेणार असल्याची माहिती मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली. जनतेच्या आशीर्वादाने आणि ईश्‍वराच्या कृपेने मंत्री ढवळीकर लवकर बरे होऊन परतले आहेत. त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते सोमवारी रात्री निवासस्थानी दाखल झाले आहेत.  ते 13 ऑगस्टपर्यंत कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना हजर राहणार नसून लोकांनाही काही दिवस भेटणार नाहीत.  19 जुलैपासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनातच  जाणार असल्याचे बंधू डॉ. संदीप ढवळीकर यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.  मंत्री ढवळीकर मागील सुमारे एक आठवडा मुंबईच्या हिरानंदाणी इस्पितळात उपचारासाठी दाखल झाले असून त्यांच्यावर लहानशी शस्त्रक्रियाही केली होती. ते राज्यात मंगळवारी येणार असल्याचे आधी सांगण्यात आले असले तरी सुरक्षेसाठी एक दिवस आधीच त्यांना राज्यात आणले गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.