Tue, Jul 23, 2019 04:11होमपेज › Goa › स्त्री अनेक भूमिका निभावते

स्त्री अनेक भूमिका निभावते

Published On: Mar 12 2018 1:04AM | Last Updated: Mar 11 2018 11:45PMफोंडा : प्रतिनिधी

स्त्री एकाचवेळी अनेक भूमिका निभावत असते. त्यांच्यातच समाजाला योग्य दिशा देण्याची आणि परिवर्तन घडविण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केेले. 

दासळवाडा-कुंडई येथे शिपबिल्डिंग संस्थेतर्फे आयोजित विविधांगी प्रशिक्षण कार्यशाळेच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्थानिक सरपंच रामू नाईक, बांदोडा पंचायतीचे सरपंच रामचंद्र नाईक, प्राचार्य गोपाळ, मोहन कुंडईकर, महादेव मुरगणी, प्रशांत फडते व पंचायत सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. 

मडकई, बांदोडा व कुंडई येथे गेल्या कित्येक वर्षांपासून विविध शिबिरे घेण्यात येत आहे. शिबिरांमुळे स्थानिक महिलांना आपल्या कौशल्य गुणांना वाव देण्याची संधी मिळते. मात्र प्रशिक्षणानंतर महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही ढवळीकर यांनी सांगितले.   

पंचायत क्षेत्रातील अनेक महिलांनी प्रशिक्षण घेतले असून या प्रशिक्षणाचा त्या नक्कीच वापर करतील, असे यावेळी सरपंच रामू नाईक यांनी सांगितले.  प्राचार्य गोपाळ यांनी स्वागत केले. तर राधा मुधोळकर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी प्रशिक्षणात भाग घेतलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.