Tue, Aug 20, 2019 04:08होमपेज › Goa › उद्या फेरीधक्क्याजवळ आंदोलन

उद्या फेरीधक्क्याजवळ आंदोलन

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 12:13AMपणजी : प्रतिनिधी

खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी पणजी येथील आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन सोमवार दि.18 रोजी क्रांतिदिनाच्या शासकीय कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर  फेरी धक्क्याजवळ हलवण्याचा निर्णय  खाण आंदोलकांनी  घेतला आहे, असे  गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे नेते पुती गावकर यांनी सांगितले.

मागील सहा दिवसांपासून खाण आंदोलक पणजीत आंदोलन करीत असून क्रांतिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर आझाद मैदानावरील आंदोलन सोमवारी फेरीधक्क्याजवळ  हलवणार असल्याचे  गावकर म्हणाले.

राज्यातील बहुसंख्य लोक खाण व्यवसायावर अवलंबून आहेत. खाण व्यवसाय सुरू होणे ही काळाची गरज आहे. सरकारने याप्रश्‍नी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र आश्‍वासनाची पूर्तता न झाल्याने  खाण अवलंबित पणजी, साखळी, धारबांदोडा व सावर्डे येथे धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेत आहेत, असेही गावकर म्हणाले.

पणजीतील आझाद मैदानावर दरवर्षी 18 रोजी क्रांतिदिनाचा शासकीय कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामुळे सोमवार दि.18 रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास खाण आंदोलकांना परवानगी नाकारण्यात आल्याने हे आंदोलन  अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात दाखल झाले आहेत. खाणविषयी ते सोमवारी किंवा मंगळवारी चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. खाण आंदोलकदेखील मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असून  यासाठी  त्यांची वेळ  मागितली जाईल, असेही गावकर म्हणाले.