Thu, Apr 25, 2019 04:01होमपेज › Goa › कायद्याच्या चौकटीतच खाणी सुरू कराव्यात : आ. फालेरो 

कायद्याच्या चौकटीतच खाणी सुरू कराव्यात : आ. फालेरो 

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 27 2018 1:24AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात अनेक उद्योग खाण व्यवसायामुळे वाढत गेले. खाण व्यवसायासाठी 1.4 लाख झाडे कापण्यात आली. खाण व्यवसायात अनेक अवैध गोष्टी घडत असून खाणींमुळे राज्याचे  खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने कायद्याच्या  चौकटीत  राहूनच घ्यावा, असे मत नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांनी व्यक्त केले.

विधानसभेत खाण विषयावरील अनुदानित मागण्यांवर लुईझिन फालेरो बोलत होते. वन व खाण व्यवसायातील कोणत्याही लहान-सहान बाबींचा राज्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होतो. खाणींमुळे पूर्वीचे पर्वत व टेकड्या गायब झाल्या असून औद्योगिक वसाहती वाढत आहेत. शहा आयोगाकडे सरकार दुर्लक्ष करू शकते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करू शकत नसल्याचे फालेरो यांनी सांगितले.