Thu, Jul 18, 2019 17:06होमपेज › Goa › खाण खाते कार्यालय टाळे प्रकरण  : अल्वारिस यांचा जामिनासाठी अर्ज

खाण खाते कार्यालय टाळे प्रकरण  : अल्वारिस यांचा जामिनासाठी अर्ज

Published On: Jun 21 2018 1:25AM | Last Updated: Jun 20 2018 11:56PMपणजी : प्रतिनिधी  

खाण खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याप्रकरणी  पणजी पोलिसांनी  समन्स बजावल्यानंतर   गोवा फाऊंडेनशच्या  क्‍लॉड अल्वारीस यांनी  बुधवारी पणजीच्या जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली.

अल्वारीस  यांनी  12 मे रोजी  पणजी येथील खाण खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. याप्रकरणी  अल्वारिस आणि राहुल बासू यांच्या विरोधात पणजी पोलिसांनी 13 मे रोजी भारतीय दंड संहितेच्या 341, 342 व 353 कलमान्वये गुन्हा नोंद केला होता.

आल्वारीस यांच्या विरोधात सरकारी कार्यालयाचे नुकसान केल्याप्रकरणी, सरकारी कामात अडथळा आणला व सुरक्षा रक्षकाला सेवा बजावण्यापासून रोखल्यामुळे  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार आल्वारीस यांना समन्स बजावून  बुधवारी  संध्याकाळी  4 वाजता पणजी पोलिसांनी चौकशीसाठी हजर रहा,असे सांगितले होते. मात्र  समन्स मिळताच त्यांनी   अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली.   या याचिकेवरील सुनावणी तहकूब केली आहे. राज्यातील खाण घोटाळ्याप्रकरणी  खाण खात्याकडून  कुठलीच कारवाई केली जात नसल्याचा दावा करून   आल्वारीस यांनी  खाण  खात्याच्या कार्यालयाला  टाळे ठोकले होते.