Sun, Feb 17, 2019 17:47होमपेज › Goa › गोवा डेअरीतील दूध पावडर भेसळीच्या संशयावरून जप्त

गोवा डेअरीतील दूध पावडर भेसळीच्या संशयावरून जप्त

Published On: May 19 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 11:26PMपणजी : प्रतिनिधी  

कुर्टी फोंडा येथील  गोवा डेअरीत शुक्रवारी छापा टाकून दूध पावडरच्या   प्रत्येकी 25 किलोच्या सुमारे 71 पिशव्या जप्त केल्याची माहिती  प्रशासनाच्या संचालक ज्योती सरदेसाई यांनी दिली. डेअरीकडून वापरण्यात येणार्‍या दूध पावडरचे नमुनेही जप्‍त करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गोवा डेअरीकडून वापरण्यात येणारी दूध पावडर भेसळयुक्‍त असल्याची तक्रार अन्‍न व औषध प्रशासनाकडे फोनद्वारे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी कुर्टी फोंडा येथील गोवा डेअरीत जाऊन   त्यांच्याकडून वापरण्यात येणार्‍या दूध पावडरची तपासणी केल्याचे सरदेसाई यांनी सांगितलेदूध पावडरचे नमुने घेऊन उर्वरीत दूध पावडरच्या सर्व पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. नमुन्यांचा अहवाल येईपर्यंत ही दूध पावडर वापरू नये, असेही गोवा डेअरी व्यवस्थापनाला सांगण्यात आले आहे.  सदर कारवाई हा नियमित तपासणीचाच भाग असल्याचेही त्यांनी सांगितले.