Thu, Feb 21, 2019 00:57होमपेज › Goa › लोबो-चोडणकर भेटीमुळे राजकीय चर्चेला ऊत

लोबो-चोडणकर भेटीमुळे राजकीय चर्चेला ऊत

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:17AMपणजी : प्रतिनिधी

भाजपचे कळंगुटचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस गिरीश चोडणकर यांची गुरुवारी पणजीतील एका हॉटेलात भेट होऊन त्यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारपणामुळे अमेरिकेत उपचार घेत असल्याने राज्यातील प्रशासनाचा ताबा त्रिमंत्री  समितीकडे सोपवण्यात आला आहे. त्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी गोव्यात येऊन केलेल्या सरकारच्या नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही, या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर लोबो आणि चोडणकर यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत लोबो यांना भाजप नेत्यांकडून मिळत असलेल्या सापत्नभावामुळे लोबो नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात संपूर्ण उत्तर गोवा पीडीएच्या अध्यक्षपदी असलेल्या लोबो यांना विश्‍वासात न घेता ग्रेटर पणजी आणि मोपा असे दोन स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करून त्यांच्या अधिकारावर नियंत्रण आणले गेल्याची भावना लोबो यांची झाली असल्याचेही त्यांनी खासगीरीत्या बोलून दाखवले आहे. 

लोबो हे महत्वाकांक्षी आमदार असून ते कळंगुटलगतच्या साळगाव, म्हापसा आणि शिवोली मतदारसंघातही आपल्या दानशूर स्वभावामुळे आणि विकासकामांमुळे लोकप्रिय झाले आहेत. 

Tags :Goa, Goa news, Michael Lobo, Girish Chodankar, visited, Political, discussion,