होमपेज › Goa › म्हापशात उद्या म्हादईप्रश्‍नी जनजागृती   

म्हापशात उद्या म्हादईप्रश्‍नी जनजागृती   

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:15AM

बुकमार्क करा
बार्देश : प्रतिनिधी

गोव्यात सध्या गाजत असलेल्या म्हादईच्या पाणी प्रश्‍नावरून वादंग निर्माण झालेले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा   यांना पत्र पाठवून राज्यातील लोकांची या प्रश्‍नावरून दिशाभूल केली आहे.    आजी-माजी आमदार व मंत्र्यांनी याला पाठिंबा द्यावा, आम्ही  गोंयकार या संघटनेच्या नेतृत्त्वाखाली येत्या 13 रोजी संध्याकाळी 5.30 वा. श्री हनुमान नाट्यगृहाच्या बाजूला असलेल्या प्रिती भोजनकक्षात जनजागृती  मोहीम आयोजित केल्याची माहिती आम्ही गोंयकारचे  राजन घाटे यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी त्यांच्या समवेत श्री बोडगेश्‍वर शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय बर्डे, अ‍ॅड. शशिकांत जोशी, शेख रियाझ, व याकूब शेख उपस्थित होते. यावेळी बोलताना अ‍ॅड. शशिकांत जोशी म्हणाले की, प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर  हे मुख्यमंत्री असतानाही म्हादई पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. पण नंतर तो थंडावला. आता मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकाच्या माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना पत्र पाठवून पाणी प्रश्‍नाला यू टर्न देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आम्ही कधीही साथ देऊ शकणार नाही, असे ते म्हणाले.

तर संजय बर्डे यांनी सांगितले की,  गोव्याने न्यायालयात या प्रश्‍नासाठी जनतेचे कोट्यवधी रूपये खर्च केेले.हे जनेतेचे पैसे आहेत. म्हादईचे पाणी कर्नाटकाला दिल्यास गोवेकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे. स्मार्ट सिटी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा जो संकल्प आहे तो त्यांनी विसरून आधी पणजीच्या लोकांना पाणी पुरवावे. आज काँग्रेसमधील एक आमदार आलेक्स रेजिनाल्ड हे एकटेच विरोध करीत आहेत. पण काँग्रेसचे इतर नेते कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत, त्यामुळे भाजप नेत्यांचे फावले, असे  शेवटी संजय बर्डे म्हणाले.