Fri, Sep 20, 2019 04:42होमपेज › Goa › ‘माट्टी’सह ‘माडा’ला ‘राज्य वृक्ष’दर्जा

‘माट्टी’सह ‘माडा’ला ‘राज्य वृक्ष’दर्जा

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 2:02AM

बुकमार्क करा

पणजी :

गोवा कृषी खात्याने ‘माट्टी’सह आता ‘माड’ला देखील ‘राज्य वृक्ष’ दर्जा प्रदान केल्याची  अधिसूचना  जारी केली आहे.

कृषी खात्याच्या अवर सचिव शैला भोसले यांनी बुधवारी उशिरा काढलेल्या अधिसूचनेत  गोवा, दमण आणि दीव वृक्ष संरक्षण कायदा- 1984 च्या कलम-7 (अ)अन्वये  प्राप्त अधिकारानुसार गोव्यात आता ‘माट्टी’ आणि ‘माड’ असे दोन ‘राज्य वृक्ष’  म्हणून ओळखले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या दोन्ही वृक्षांना राज्यात असलेले पर्यावरणीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व वारसा मूल्य लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

माट्टीला 25 वर्षांहून अधिक काळापासून राज्य वृक्षाचा दर्जा आहे. माट्टी वृक्षामध्ये आपल्या खोडात उन्हाळ्यातही पाणी साठवण्याची क्षमता असून हा वृक्ष अग्निरोधक आहे. 

माजी मुख्यमंत्री पार्सेकर सरकारच्या कार्यकालात जानेवारी-2016 मध्ये घेतलेल्या माडाला गवत ठरवण्याच्या निर्णयाविरोधात जनआंदोलन उभारून आपली राजकीय वाटचाल सुरू केलेल्या ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षाच्या मागणीनुसार ‘माड’ हा आता राज्य वृक्ष म्हणून अधिसूचित करण्यात आला आहे.

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex