Thu, Sep 20, 2018 06:08होमपेज › Goa › कांदोळी येथे दहा लाखांचा गांजा जप्त

कांदोळी येथे दहा लाखांचा गांजा जप्त

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 11:45PM

बुकमार्क करा

म्हापसा : प्रतिनिधी

  कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथे गांजाची शेती केल्याप्रकरणी सुशांत साहू (26) व प्रकाश सलाम (20) यांना बुधवारी संध्याकाळी अटक करून  त्यांच्याकडून  10  किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत 10 लाख रूपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी  दिलेल्या  माहितीनुसार  कांदोळी येथे लॅनी फियलो यांच्या परसात गांजाची रोपे लावल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.  त्यानुसार कांदोळीजवळच्या आराडी भागात संध्याकाळी 5.30 ते 8 च्या  दरम्यान पाळत ठेवून सुशांत साहू व प्रकाश सलाम  यांना अटक केली.

  संशयितांनी  पोलिसांना कांदोळी येथील  लॅनी फिएलो याने गांजाची रोपे आपल्या परसबागेत लावल्याची माहिती दिली. पोलिसांनी अंमली पदार्थ  विरोधी कायद्याच्या कलम नं. 2 (अ)(1) या नुसार लॅनी फिएलो विरूद्ध गुन्हा नाेंंदवला आहे. कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.