होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांच्या द्विपक्षीय चर्चेच्या भूमिकेविरोधात म्हापशात निदर्शने

मुख्यमंत्र्यांच्या द्विपक्षीय चर्चेच्या भूमिकेविरोधात म्हापशात निदर्शने

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 30 2017 12:19AM

बुकमार्क करा
म्हापसा : प्रतिनिधी

कर्नाटकला म्हादईचे पिण्याचे पाणी देण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या द्विपक्षीय चर्चेच्या भूमिकेचा गोवा सुरक्षा मंचच्या उत्तर गोव्यातील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी हुतात्मा चौकात निदर्शने करून विरोध केला.

या प्रसंगी गोवा सुरक्षा मंचचे उत्तर गोवा सचिव संदीप पाळणी, सदस्य हर्षद देवारी, तेजस काणेकर, विनायक च्यारी, शिवेसेनेचे जितेश कामत, सुनील मेथर यांनी मुख्यमंत्र्यांच्या द्विपक्षीय चर्चेच्या भूमिकेचा निषेध केला.

म्हादई वाचवा, गोवा वाचवा, म्हादई वाचवा-मांडवी वाचवा, म्हादई नदी गोव्याचा प्राण, म्हादई प्रश्‍नी मुख्यमंत्री पर्रीकरांचा आणखी एक यू टर्न अशा घोषणा निदर्शकांनी दिल्या.