होमपेज › Goa › १३  वे अखिल गोमंतकीय पुरोहित ब्राम्हण स्नेहसंमेलन उद्या

१३  वे अखिल गोमंतकीय पुरोहित ब्राम्हण स्नेहसंमेलन उद्या

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 10:49PM

बुकमार्क करा
म्हापसा : प्रतिनिधी

 13 वे  अखिल गोमंतकीय पुरोहित ब्राम्हण स्नेहसंमेलन सोमवार दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वा.ते संध्याकाळी 5 पयर्ंत पर्वरी येथील वेताळ महारूद्र संस्थानात आयोजित केले आहे अशी माहिती अध्यक्ष वामन दामोदर केळकर यांनी पत्रकारांनी दिली आहे. सकाळी 8 ते 9 पयर्ंत श्री देव सेवा 9 ते 9.30 पयर्ंत नाश्ता , सकाळी 9.30 वा. वे.शा.सं.महामधोपाध्याय  देवदत्त पाटील गुरूजी यांच्याहस्ते उद्घाटन होईल. सकाळी 11 ते 12.30 वा. पयर्ंत वे.शा.सं. प्रभाकर जोगळेकर गुरूजीचे मार्गदर्शन.  

1 ते 2.30 पयर्ंत भोजन.द्वितीय सत्र  2.30 वा. पुरोहिताच्या जीवनातील समस्या संध्या 3.30 वा   सत्कार सोहळा प्रमुख पाहुणे डॉ.गोविंद काळे सत्कारमूर्ती वे.मु.देविदास उमर्ये -डिचोली, वे.मु. परशुराम मराठे - मुळगांव, वे.मु. उमाकांत पेठकर  - नार्वे यांचा सत्कार होईल.  सर्व पुरोहितांनी एकत्र यावे व कर्मकंडातील चालू असलेल्या आपल्या विशिष्ट  ज्ञानाचा लाभ इतरांना द्यावा तसेच दैनंदिन कामात येणार्‍या समस्या ,अडचणी , शंका इतर बाबी निदर्शनास आणून त्यावर  चर्चा व्हावी यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पुरोहित ब्राम्हण संघाचे अध्यक्ष वामन केळकर यांनी केले आहे.