Tue, May 21, 2019 00:04होमपेज › Goa › ‘सुपर क्‍वालिटी मार्केट’चे म्हापशात उद्घाटन

‘सुपर क्‍वालिटी मार्केट’चे म्हापशात उद्घाटन

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 19 2018 1:12AMम्हापसा : प्रतिनिधी 

माजी आमदार किरण कांदोळकर यांच्या मालकीच्या ‘सुपर क्‍वालिटी मार्केट’ या सुपर मार्केटचे रविवारी संध्याकाळी खोर्ली-सीम येथे नगरविकासमंत्री अ‍ॅड.फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते फीत कापून    उद्घाटन करण्यात आले. नगराध्यक्ष रोहन कवळेकर यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. माजी सहकारमंत्री महादेव नाईक, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष  अंकिता नावेलकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, रायन ब्रागांझा, संजय मिशाळ, संदीप फळारी, फँ्रकी कारव्हालो, सुशांत हरमळकर, राजसिंह राणे, नगरसेविका  विभा साळगावकर, अ‍ॅना आफोंसो, कविता आर्लेकर, थिवी मतदार संघातील सरपंच, पंचायत सदस्य, व किरण कांदोळकर यांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

सुपर क्‍वालिटी बाजार या नावाने म्हापशात एक नवी सुविधा उपलब्ध झाली आहे. खोर्ली भागातील पाच प्रभाग व अन्साभाट भागातील दोन प्रभाग मिळून सात प्रभागांतील लोकांची सुपर मार्केटमुळे मोठी सोय झाली. या मार्केटमध्ये  मालाचा  वाजवी  दर ठेवण्यात आहे. माजी आमदार किरण कांदोळकर यांनी खूप परीश्रम घेऊन आंतरराष्ट्रीय  दर्जाचे एक सुपर मार्केट सुरू केले आहे.लोकांनी याचा फायदा घ्यावा ,असे आवाहन नगरविकासमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी केले. या मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या वस्तूंबरोबर ताजी मासळी, चिकन, ताजी भाजी उपलब्ध आहे.  सहा महिन्यांपासून या सुपर मार्केटच्या नियोजनाचे काम सुरु होते , असे किरण कांदोळकर यांनी सांगितले. सुभाष नाईक यांनी आभार मानले.