Wed, Sep 26, 2018 14:15होमपेज › Goa › म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालयाची झडती

म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालयाची झडती

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 1:33AMपणजी : प्रतिनिधी 

सेरुला कोमुनिदाद बेकायदेशीर  भूखंड  रुपांतरण प्रकरणी  गुन्हा अन्वेषण विभागाने म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालयाची मंगळवारी झडती घेतली.उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा अन्वेषण विभागाने म्हापसा जिल्हाधिकारी कार्यालयाची झडती घेण्यासदंर्भात वॉरंट आणले होते. त्यानुसार विभागाकडून कार्यालयातील सेरूला भूखंड रुपांतरणासंबंधीच्या फाईल्सची पडताळणी करण्यात आली. या फाईल्सची पडताळणी करण्यास  उपजिल्हाधिकार्‍यांनीदेखील परवानगी दिली. गुन्हा अन्वेषण विभागाकडून 1997-98 या काळात सेरुला   कोमुनिदाद येथील भूखंड रुपांतरणा संबंधीच्या फाईल्सची पडताळणी केल्याचेही त्यांनी सांगितले. सेरुला  कोमुनिदाद भूखंड घोटाळ्याचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडून केला जात आहे. याप्रकरणी यापूर्वी काही जणांना अटकदेखील करण्यात आली होती.