Sat, Nov 17, 2018 18:56होमपेज › Goa › महिलेस साखळदंडाने बांधून कोंडले

महिलेस साखळदंडाने बांधून कोंडले

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 27 2017 1:23AM

बुकमार्क करा
मडगाव ः प्रतिनिधी 

मानसिक स्वास्थ बिघडलेल्या आपल्या सख्ख्या वयोवृद्ध बहिणीला लोखंडी साखळीने जनावरांप्रमाणे कुलूप लावून बांधून ठेवणार्‍या  भावाचा प्रताप मंगळवारी कुडतरी मतदारसंघात समोर आला. भावाच्या जाचातून सुटलेल्या आणि पायात लोखंडी साखळी आणि कुलूप घेऊन रस्त्यात फिरणार्‍या  असाहाय्य महिलेच्या सुटकेसाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकालाच शिवीगाळ करून सर्वांसमक्ष तिला रस्त्यातच मारहाण करून घेऊन जाणार्‍या  भावावर पोलिस कोणतीच कारवाई करू न शकल्याने पोलिसांच्या असाहाय्यतेबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. पायात लोखंडी साखळी अडकवलेल्या स्थितीतील पन्नास ते पंचावन्न वर्षे वयाची महिला रामनगरी भागात रस्त्यावरून फिरत असल्याचे मंगळवारी आढळून आले.

मडगाव भागात कामाला जाणार्‍या लोकांनी हा प्रकार पाहून महिलेची विचारपूस केली असता आपण याच भागात राहत असल्याचे तिने सांगितले. भूक लागली म्हणून आपण साखळी घेऊन बाहेर पडले, अशी माहिती तिने लोकांना दिली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने काही लोकांनी तिचे फोटो घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केले. काहींनी मायणा कुडतरी पोलिस, स्वयंसेवी संघटनांचे सदस्य तसेच पत्रकारांना याबाबत माहिती दिली. सदर महिला लोखंडी साखळ्या पायात अडकवलेल्या अवस्थेत भगवती टाईल्स जवळील जंक्शनवर बसून असल्याची माहिती  स्थानिकांनी  मायणा कुडतरी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक आलविटो रॉड्रिग्ज यांना घटनास्थळी चौकशीसाठी दाखल झाले. पसाखळीच्या एका