Mon, Jun 17, 2019 04:35होमपेज › Goa › मुरबाडच्या बाजारपेठेत शुक्रवारी रात्री भीषण आग; जीवितहानी नाही

मुरबाडच्या बाजारपेठेत शुक्रवारी रात्री भीषण आग; जीवितहानी नाही

Published On: Jan 06 2018 1:21AM | Last Updated: Jan 05 2018 11:22PM

बुकमार्क करा
मडगाव ः विशाल नाईक

कोणत्याही मूलभूत साधन-सुविधांशिवाय केपे तालुक्यातील वावुर्ला गावात उपेक्षितांचे जीवन जगणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांच्या साथीदारांना स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. आता सामान्य गावांप्रमाणे या गावालाही पाणीपुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य आणि शिक्षणा सारख्या सुविधा मिळणार आहेत. यासाठी विविध सरकारी खात्यांचा समावेश असलेले पथक नियुक्त करण्यात आले असून दि. 10 जानेवारी रोजी या पथकाकडून वावुर्ला गावाची पाहणी करून या संबंधीचा अहवाल सरकारकडे पाठवला जाणार आहे.

आदिवासी कल्याण खात्याचे संचालक व्हेनान्सियो फुर्तादो यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मडगावात अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत केपेचे मामलेदार प्रतापराव गावकर देसाई, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, जलस्रोत खात्याचे अभियंता, वीज खाते, आरोग्य खाते , शिक्षण खात्याचे अधिकारी आणि वावुर्ला येथील ग्रामस्थ उपस्थित होते. गावात रस्ता, वीज, पाणी, शाळा आणि आरोग्य केंद्र अशा मुलभूत सुविधा पुरविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. 

शुक्रवारी (दि. 5) पार पडलेल्या बैठकीत आदिवासी आयोगाचे अध्यक्ष फुर्तादो यांनी वीज खाते, जलस्रोत खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, आरोग्य आणि शिक्षण खात्याच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेले खास पथक नेमले असून 10 जानेवारी रोजी हे पथक वावुर्ला येथे भेट देऊन त्यांच्या गरजा जाणून घेईल. फुर्तादो यांनी 19 जानेवारी रोजी दुसरी बैठक बोलावली असून या बैठकीत हे पथक अहवाल सादर करेल.

व्हेनान्सियो फुर्तादो म्हणाले, 19 जानेवारीच्या बैठकीनंतर आपण वावुर्ला गावाला भेट देणार असून यानंतर सरकारला अहवाल सादर केला जाईल. हा गाव केपे तालुका हद्दीत येत असून गावातील लोकांना केवळ सरकारी कामासाठी केपेत यावे लागते. पण, शिक्षण, आरोग्य आणि बाजारासाठी लोकांना काणकोणवर विसंबून राहावे लागते. त्यामुळे गावाला खोतीगाव येथून रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांंंनी केली.

वावुुर्ला गाव हा केपे तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी या गावाचा वापर पोर्तुगीज सैनिकांपासून लपण्यासाठी करीत होते. या कामी गावातील लोक त्यांना मदत करीत. गोवा मुक्तीनंतर या गावाचा सरकारला विसर पडला होता. चाळीस घरांच्या या गावांना अजून वीजपुरवठा, पाणीपुरवठा, रस्ता नाही. सुमारे चार तास डोंगरातील पायवाट चालून ग्रामस्थ ये-जा करतात. एका भाड्याच्या खोलीत पाचवीपर्यंतचे विद्यालय आहे. पुढील शिक्षणासाठी मुलांना पायपीट करत काणकोणमधील खोतीगाव येथे यावे लागते. दैनिक पुढारीने याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. उशिरा का होईना, अखेर प्रशासनाला यामुळे जाग आली आहे,अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या गावाला रस्ता बांधून देताना पाणी व वीजपुरवठा, बीएसएनएल जोडणी एकाचवेळी देण्याच्या दृष्टीने पाहणी करावी, अशी सूचना फुर्तादो यांनी पथकाला दिली आहे.