Sun, May 26, 2019 18:48होमपेज › Goa › वेश्या व्यवसायप्रकरणी मडगावात दोघांना अटक

वेश्या व्यवसायप्रकरणी मडगावात दोघांना अटक

Published On: Jan 17 2018 2:12AM | Last Updated: Jan 17 2018 1:57AM

बुकमार्क करा
मडगाव : प्रतिनिधी

मडगाव पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत वेश्या व्यवसायासाठी गोव्यात आणलेल्या  कोलकाता येथील एका 28 वर्षीय युवतीची सुटका करून दलाल फातिमा मुकादम (वय 37, रा. मुंबई) व संदीप बोरकर (53, रा. मडगाव) यांना  अटक केली. पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ईएसआय इस्पितळाजवळील परिसरात कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता येथील युवती सध्या मुंबई येथे राहत होती.

संशयित फातिमा मुकादम हिने वेश्या व्यवसाय करण्यासाठी मुंबईहून तिला गोव्यात आणले होते.  कारवाईदरम्यान संदीप बोरकर हाही या प्रकरणात सहभागी असल्याचे समजले.  फातिमा ठाणे, मुंबई येथील रहिवासी आहे. संदीप  बोरकर हा मडगाव येथील पांडव कपेलजवळ राहतो. मडगाव पोलिसांना ईएसआय इस्पितळाजवळील परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून संशयितांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.