Tue, Jul 23, 2019 02:40होमपेज › Goa › जनमत कौल’ची माहिती अभ्यासक्रमात 

जनमत कौल’ची माहिती अभ्यासक्रमात 

Published On: Jan 17 2018 2:12AM | Last Updated: Jan 17 2018 2:06AM

बुकमार्क करा
मडगाव ; प्रतिनिधी 

जनमत कौलामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. गोवा महाराष्ट्रात विलीन होऊ नये यासाठी गोव्यातील नेत्यांनी जात-पात, धर्म, भाषा आणि भाग असा भेदभाव न करता एकत्र येऊन लढा दिला; पण इतिहासाच्या पानात या लढ्याची अजून संपूर्ण माहिती उपलब्ध नाही, ही खेदाची बाब आहे. पुढील पिढीला जनमत कौल आणि त्यासाठी आपल्या पूर्वजांनी दिलेल्या लढ्याची माहिती मिळावी यासाठी 2019 सालच्या शैक्षणिक वर्षात खास समिती नेमून या लढ्याची माहिती शालेय इतिहासाच्या पुस्तकात समाविष्ट केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.

मडगावच्या रवींद्र भवनात जनमत कौल दिनाच्या निमित्ताने गोवा सरकार राज्यभाषा संचालनालय व रवींद्र भवन मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अस्मिता  दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात मुख्यमंत्री पर्रीकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, उपसभापती मायकल लोबो, मंत्री जयेश साळगावकर, जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर, मडगावच्या नगराध्यक्षा बबिता आंगले, रवींद्र भवनचे सदस्य सचिव पंढरीनाथ नाईक, कोकणी भाषा मंडळाचे चेतन आचार्य  उपस्थित होते.

गोव्याला मुक्ती मिळून सात वर्षे  उलटूनसुद्धा  गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वाबाबत लोकांच्या मनात  भीती होती, जनमत कौलानंतर गोवा महाराष्ट्रात विलीन होणार नाही, यावर  शिक्कामोर्तब झाले, तेव्हा लोकांची भोती दूर झाली. गोव्याला घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाला आणि गोव्याच्या विकासाला चालना मिळाली, असे पर्रीकर म्हणाले. जनमत कौल लढ्याचा इतिहास समजून घ्यावा.