Sun, Nov 18, 2018 04:56होमपेज › Goa › मडगावात पंचवीस हजारांची व्हॉल्व्हची चोरी; दोघे ताब्यात

मडगावात पंचवीस हजारांची व्हॉल्व्हची चोरी; दोघे ताब्यात

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 15 2018 12:35AM

बुकमार्क करा
मडगाव  :प्रतिनिधी

मडगाव येथील श्री दामोदर चेंबर इमारतीत घुसून सुमारे पंचवीस हजार रुपये किंमतीचे पाण्याच्या टाकीचे व्हॉल्व्ह चोरणार्‍या दोन परप्रांतीयांना मडगाव पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. संशयित आरोपींची नावे शिवाजी प्रसाद (22) आणि सनत कुमार(26, दोघेही रा.बंगळुरू कर्नाटक ) या दोघांनी चोरी केली. चोरीची घटना शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली होती.

इसिदोरो बाप्तिस्ता रोड वरील श्री दामोदर चेंबर्स या इमारतीतील सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीचे व्हॉल्व चोरल्याची तक्रार याच इमारतीत राहणारे एंथोनी गोम्स यांनी मडगाव पोलिस स्थानकात केली होती. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे हे दोन व्हॉल्व्ह ब्रासपासून बनविण्यात आले होते. मडगाव पोलिसांनी चौकशी अंतर्गत शिवाजी प्रसाद आणि सनत कुमार या दोघा सशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे मान्य केले. मडगाव पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांकडून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास माडगाव पोलिस करीत आहेत.