Thu, Jan 24, 2019 07:43होमपेज › Goa › मासळी कापणार्‍यांसाठी स्वतंत्र शेड

मासळी कापणार्‍यांसाठी स्वतंत्र शेड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मडगाव ; प्रतिनिधी

मासळी कापण्याचे काम करणार्‍यांमुळे मासळी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले असून मासळी कापणार्‍यांसाठी स्वतंत्र शेड बांधून दिली जाईल, असे आश्वासन नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दिले.  सरदेसाई यांनी शुक्रवारी किरकोळ मासळी बाजाराच्या बांधकामाची पाहणी केली. 30 मे रोजी बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी जास्त कामगार वापरून कामाला गती द्यावी, अशी सूचना सरदेसाई यांनी दिली. मासळी कापणार्‍यांची संख्या याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. सरदेसाई यांनी मार्केटची पाहणी केल्यानंतर तेथील कचरा पाहुन तीव्र नाराजी व्यक्त केली.

सध्या किरकोळ मासळी बाजाराचे एक कोटी रूपये खर्चून सुशोभी करण केले जात आहे. घटकराज्य दिनाच्या दिवशी या वास्तूचे उद्घाटन होणार आहे. मडगाव आणि सासष्टीच्या लोकांना आम्हला उत्तम दर्जाचे मासळी मार्केट उपलब्ध करून द्यायचे आहे, असे सरदेसाई यावेळी म्हणाले. दुबईत असलेल्या मासळी मार्केटच्या धर्तीवर हे मासळी मार्केट बांधले जात आहे. मात्र हे मासळी मार्केट वातानुकूलित नसेल, असे त्यांनी सांगितले.

बांधकामाच्या आराखड्यात बदल केले जात असल्याने कामाची गती मंदावल्याचे कंत्राटदाराने मंत्री सरदेसाई यांच्या निदर्शनात आणून दिले. सध्याच्या मार्केटमध्ये सर्व बदल केले जातील. मासळी विक्री करण्याचे काऊंटर आणि लोकांना बसण्यासाठी बांधलेले बाक मोडून टाकण्यात आले आहेत.आधुनिक पद्धतीने ग्राहकांना ट्रे मधून मासळी दाखवली जाईल. शिवाय मासळीसाठी वापरला जाणार्‍या बर्फाचे पाणी थेट गटारात सोडले जाईल. त्यासाठी स्टिलची गटारे बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
 


  •