Thu, Sep 20, 2018 23:50होमपेज › Goa › मडगाव रेल्वे स्थानकावर १० हजारांची दारू जप्त 

मडगाव रेल्वे स्थानकावर १० हजारांची दारू जप्त 

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:34PM

बुकमार्क करा

मडगाव :(प्रतिनिधी) 

कोकण रेल्वे पोलिसांनी मडगाव रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री संशयित गजेश मुळे याच्याकडून सुमारे 10 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू रेल्वे पोलिसांनी जप्त करून त्याला अटक केली. ही दारू संशयित मुंबईला नेण्याच्या प्रयत्नात होता. मडगाव रेल्वे स्थानकावर तो आला असता पोलिसांनी त्याची तपासणी करून  त्याच्याकडील दारू जप्त करून त्याला अटक करून मडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल नीलेश कासकर, रमाकांत देसाई व सुभाष नाईक यांचा सहभाग होता.