Mon, Jun 24, 2019 16:35होमपेज › Goa › लक असते, फायदा घ्यायला कळले पाहिजे

लक असते, फायदा घ्यायला कळले पाहिजे

Published On: Feb 04 2018 2:22AM | Last Updated: Feb 04 2018 2:20AMमडगाव : प्रतिनिधी 

प्रत्येक व्यक्‍तीकडे ‘लक’ नावाची गोष्ट असते; फक्‍त प्रत्येकाला त्या ‘लक’ चा फायदा करून घ्यायला कळले पाहिजे. एका गरीब कुटुंबात जन्मलेलो आपणही ह्याच ‘लक’ चा फायदा घेत व पालकांच्या निरंतर पाठिंब्यामुळे नोबेल पुरस्कारापर्यंत पोहोचलो, असे विचार नोबेल पुरस्कार प्राप्त रिचर्ड रॉबर्टस् यांनी शनिवारी व्यक्‍त केले. केंद्र सरकारचे जैवतंत्रज्ञान मंत्रालय, गोवा सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान खाते आणि स्वीडनच्या नोबेल मीडियाद्वारे शनिवारी मडगावच्या रवींद्र भवनमध्ये आयोजित विद्यार्थी व शिक्षकांबरोबर झालेल्या प्रश्‍नोत्तर सत्रात बोलताना रिचर्ड रॉबर्टस् यांनी सदर विचार व्यक्‍त केले. यावेळी नोबेल पुरस्कार प्राप्त तोमस लिंडहाल व गोव्याच्या विविध माध्यमिक शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

अंनिका हेडस फलक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  तोमस म्हणाले, विज्ञान विषयात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात ‘लक’ बरोबरच मानसिक तयारी गरजेची असते. ‘लक’ असले व मानसिक तयारी नसली तर माणूस त्या संधीचा योग्य वापर करू शकत नाही हेही तेवढेच सत्य आहे. आजच्या काळातील तरुणांबद्दल बोलताना रिचर्ड म्हणाले की, तरुण पिढीने आपल्या जीवनात आव्हाने स्वीकारायला पाहिजे. शिवाय, जीवनात येणार्‍या आव्हानांना न भीता त्यांचा सामना करत राहायला पाहिजे. विचार करत राहायला पाहिजे. आपल्याला पडणार्‍या प्रश्‍नाचे उत्तर शोधत राहायला पाहिजे, शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.