होमपेज › Goa › आमदार प्रतापसिंह राणे ‘गोमेकॉ’त दाखल

आमदार प्रतापसिंह राणे ‘गोमेकॉ’त दाखल

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:06AMपणजी : प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तथा पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांना ताप व अपचनाचा त्रास झाल्यामुळे शनिवारी रात्री उशिरा गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता सुधारली आहे. मात्र, काही चाचण्यांसाठी त्यांना गोमेकॉत ठेवण्यात आले असून सोमवारी डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशी  माहिती  सूत्रांनी दिली.

प्रतापसिंह राणे (वय 79) यांना शनिवारी रात्री 11.30 वा.च्या सुमारास अपचनाचा त्रास होऊ लागल्यामुळे गोमेकॉत दाखल करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र तथा आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे हे बंगळूरला गेले असल्याने तेथे उपस्थित नव्हते. गोमेकॉच्या डॉक्टरांनी राणे यांची तपासणी करून काही चाचण्या केल्या. त्यांना काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याची गरज असल्याने त्यांना इस्पितळात भरती करण्यात आले.आमदार लुईझीन फालेरो, टोनी फर्नांडिस आदींनी राणे यांची भेट घेऊन प्रकृतीबाबत चौकशी केली. राणे यांची प्रकृती सुधारली असून त्यांना सोमवारी डिस्चार्ज मिळणार आहे, असे आमदार लुईझीन फालेरो यांनी सांगितले.