Wed, Nov 14, 2018 04:10होमपेज › Goa › शिमगोत्सव एकतेचे प्रतीक

शिमगोत्सव एकतेचे प्रतीक

Published On: Mar 06 2018 1:03AM | Last Updated: Mar 06 2018 1:03AMकाकोडा : वार्ताहर

शिमगोत्सव हे एकतेचे प्रतीक आहे. प्रत्येकाने या उत्सवात सर्व मतभेद विसरून सहभागी होऊन तीन दिवसीय शासकीय पातळीवर साजरा होणार्‍या शिमगोत्सवाचा आनंद लुटावा, असे आवाहन सांगे शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष तथा आमदार प्रसाद गावकर यांनी केले.

सांगे शिमगोत्सव समितीच्या तीन दिवशीय कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते  बोलत होते. सचिव सुनील भंडारी, उपाध्यक्ष कॅरोझ क्रुझ, नगरसेवक रुमाल्डो फर्नांडिस, फौजीया शेख, रोझमाडी फर्नांडिस, उगेचे सरपंच संजय परवार, नेत्रावळीच्या सरपंच रजनी गावकर, उपसरपंच दिव्या नाईक, पंचायत सदस्य सुरेश नाईक, मार्कूस परेरा, आर्यकुमार जांबावळीकर, प्रसाद नाईक, गुरुनाथ नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर बारा वर्षे वयोगटाखालील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर अखिल गोवा पातळीवर सोलो डान्स स्पर्धा घेण्यात आली.नगरसेवक कॅरोझ क्रुझ यांनी स्वागत केले. रुपेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. सुनील भंडारी यांनी आभार मानले.