Sun, Nov 18, 2018 22:14होमपेज › Goa › आमदार कार्लूस आल्मेदा इस्पितळात 

आमदार कार्लूस आल्मेदा इस्पितळात 

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 09 2018 12:22AMपणजी : प्रतिनिधी

वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा (वय 54) गुरुवारी आपल्या घरी बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्यांना दोनापावला येथील एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आल्मेदा यांच्या मेंदूला रक्‍तपुरवठा करणार्‍या वाहिनीत गाठ आढळली असून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ती  काढली आहे. आल्मेदा यांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील 48 तास वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे इस्पितळाच्या सूत्रांनी सांगितले. 

कार्लूस आल्मेदा हे वास्को मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आल्मेदा गुरुवारी सकाळी आपल्या घरात बेशुद्धावस्थेत आढळले. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांनी तातडीने  खासगी इस्पितळात दाखल केले. उपचारानंतर ते शुद्धीवर आले. त्यांची ‘एमआरआय’ तपासणी केल्यावर मेंदूत गाठ असल्याचेनिदान झाले. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून ही गाठ काढण्यात आली. कार्लूस यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आमदार आल्मेदा यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी  गुरूवारी अनेक सहकारी आमदार- मंत्री तसेच अन्य पक्षांतील पदाधिकार्‍यांची सदर इस्पितळात रिघ लागली होती.