Mon, Feb 18, 2019 05:31होमपेज › Goa › मडगावात आजपासून लोकोत्सव 

मडगावात आजपासून लोकोत्सव 

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 1:11AM

बुकमार्क करा
मडगाव : प्रतिनिधी

कला अकादमी व कला आणि सांस्कृतिक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रवींद्र भवनात राष्ट्रीय लोकोत्सव दि. 18 ते 20 दरम्यान आयोजित केला आहे. लोककोत्सवात राष्ट्रीय पातळीवरील विविध कलाकार नृत्य सादर  करणार आहेत. लोकोत्सवातील कार्यक्रम संध्याकाळी 6  ते रात्री 9  पर्यंत चालणार आहेत, अशी  माहिती रवींद्र भवनचे अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष साईश पाणंदीकर यांनी  सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 

प्रशांत नाईक म्हणाले, गुजरात (मेवासी),  ओडिशा (गोटीपूवा), राजस्थान (भवाई), पश्‍चिम बंगाल (बाऊल), दार्जिलिंग (लीचा)  ही  लोकनृत्ये तेथील कलाकार सादर करतील. कलाकार मार्शल फर्नांडिस  हे दि. 19 रोजी ‘एकच प्याला’ तील काही प्रवेश सादर करून दाखवतील.  गोव्यातील कलाकारांच्या सहकार्याने  संगीताचा कार्यक्रम होणार आहे. लोकोत्सवानिमित्त  रवींद्र भवन परिसरात खाद्य पदार्थांचे व विविध हस्तकारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल्स   भरविण्यात येणार आहेत.