होमपेज › Goa › कर्नाटक भूमिकेबाबत शिवसेनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

कर्नाटक भूमिकेबाबत शिवसेनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 26 2017 1:32AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकला पिण्यासाठी पाणी देण्यासंदर्भात घेतलेल्या द्विपक्षीय चर्चेच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र शिवसेेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. या पत्रात त्यांनी पर्रीकर यांना बॅड सांताक्लॉज म्हटले आहे.

शिवसेनेने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कर्नाटकशी द्विपक्षीय चर्चेची भूमिका घेऊन गोव्यातील नव्या पिढीचे भवितव्य हिसकावून घेतले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या राखी नाईक यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे, की सांताक्लॉज नाताळात लहान मुलांच्या चेहर्‍यावर आनंद आणण्यासाठी प्रयत्न करतो.

मात्र गोव्यातील सांताक्लॉजरुपी पर्रीकरांनी म्हादईचे पाणी कर्नाटकला देऊन त्यांचे भवितव्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.  राजकारणासाठी या जलस्रोताचा वापर करू नये.