Wed, Mar 20, 2019 02:35होमपेज › Goa › खाणप्रश्‍नी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू

खाणप्रश्‍नी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डिचोली : प्रतिनिधी

खाण बंदीमुळे ओढवलेेले संकट दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल, असे आश्‍वासन  केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले साखळी मतदारसंघ दौर्‍यात ते बोलत होते. यावेळी सभापती डॉ. प्रमोद सावंत, मंडळ अध्यक्ष प्रदीप गावडे, सुभाष फोंडेकर व विविध पंचायतींचे सरपंच, पंचायत सदस्य, नगरसेवक उपस्थित होते.

मंत्री नाईक म्हणाले की, जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार कटिबद्ध असून अनेक प्रकल्पांद्वारे राज्याचा विकासाला चालना देण्यात येत आहे. उत्तर गोव्यातील सर्वच मतदारसंघात अनेक योजना पूर्ण झालेल्या असून नव्या योजना राबवण्याचे काम सुरू आहे. उत्तर गोव्यात भव्य इस्पितळ उभारणी तसेच इतर प्रकल्पांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

विकासकामांचा आढावा घेताना खासदार निधीतून झालेली विकासकामे तसेच नियोजित विकासकामांबाबत जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी त्यांनी लोकांशी थेट संवाद साधून योजनांची माहिती दिली. उत्तर गोव्यात अनेक प्रकल्प मार्गी लावताना ग्रामीण भागाच्या विकासाला कशा प्रकारे चालना देता येईल यावर आपण भर देणार आहे. अनेक प्रकल्पांचे काम वर्षभरात पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.
सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, साखळी मतदारसंघात खासदार निधीतून अनेक योजना मार्गी लागल्या असून अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे.

खाणबंदीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. वेळगे, कुडणेसह साखळी पालिका क्षेत्रातील जनता व लोकप्रतिनिधींशी वार्तालाप करून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा केली.

खाण अवलंबितांना आधार द्या

खाण अवलंबितांना सरकारने आधार द्यावा, अशी मागणी यावेळी लोकांनी केली. पणजीतील आंदोलनात जे काही झाले त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु, खाण अवलंबितांच्या मागे पोलिसांनी लावलेला ससेमिरा थांबवावा, अशी विनंती लोकांनी केली. याप्रश्नी आपण संबंधितांशी  चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन यावेळी श्रीपाद नाईक यांनी दिले. 

 

Tags : goa, goa news, mine questions,  Shripad Naik,


  •