Mon, Apr 22, 2019 15:52होमपेज › Goa › अमली पदार्थ विरोधी कारवाईबाबत इच्छाशक्तीचा अभाव

अमली पदार्थ विरोधी कारवाईबाबत इच्छाशक्तीचा अभाव

Published On: Jun 29 2018 12:07AM | Last Updated: Jun 28 2018 11:49PMपणजी : प्रतिनिधी  

अमली पदार्थ व्यवहार केवळ किनारी भागांपुरताच मर्यादित राहिलेला नसून तो आता महाविद्यालयांपर्यंत पोहचला आहे. त्यावर कारवाई करण्यास सरकारमध्ये इच्छाशक्ती नाही, अशी टीका अखिल भारतीय विद्यार्थी परिषद  (अभाविप) उत्तर गोवा संयोजक ऋषीकेश शेटगावकर यांनी पणजीत पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेसच्या एनएसयूआयने गोव्यातील सर्व विद्यार्थी हे अमलीपदार्थांच्या आहारी गेल्याच्या विधानाचा शेटगावकर यांनी निषेध करून शेटगावकर म्हणाले, की राज्यातील अमलीपदार्थांचा विषय गाजत असताना एनएसयूआयने केलेले विधान चुकीचे आहे.  विद्यार्थ्यांनी  अमलीपदार्थांकडे वळू नये, यासाठी ‘अभाविप’ कडून  महाविद्यालयांमध्ये जागृती केली जात आहे.

‘अभाविप’कडून  2016 मध्ये राज्यातील सहा किनारी भागांमध्ये जाऊन  अमलीपदार्थांबाबत  विद्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यात मोरजी, हरमल, कळंगुट आदी किनारी भागांचा समावेश  होता. सर्व्हेक्षणाचा हा अहवाल संबंधित यंत्रणेला सादर करण्यात आला आहे. अमलीपदार्थांबाबत   राज्यात   आता पर्यंत आलेल्या कुठल्याही सरकारने कारवाई करण्याची इच्छा शक्‍ती दाखवली नसल्याचे शेटगावकर म्हणाले. 

अभिजीत देसाई म्हणाले, की ‘अभाविप’ कडून   महाविद्यालयांमध्ये   अमलीपदार्थ विरोधी मोहीम सुरु  केली जाणार आहे. पोलिसांकडून अमलीपदार्थ विक्रेत्यांना अटक केली जाते. मात्र, अमलीपदार्थ माफीया अजूनही मोकाट असून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी   सौरभ बोरकर उपस्थित होते.