Thu, Nov 15, 2018 20:28होमपेज › Goa › मनोजचा मृतदेह अखेर सापडला

मनोजचा मृतदेह अखेर सापडला

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 12:30AM

बुकमार्क करा

मडगाव/ फोंडा : प्रतिनिधी

गेल्या शनिवारी कोडली येथे वेदांता कंपनीच्या खाणीत दरड कोसळून मातीखाली गाडल्या गेलेल्या रिपर ऑपरेटर मनोज नाईक कलंगुटकर (खांडेपार) याचा मृतदेह अखेर चार  दिवसांनंतर मातीच्या ढिगार्‍याखाली सापडला. गेले चार दिवस सुरू असलेले बचावकार्य मंगळवारी सायंकाळी संपुष्टात आले. पंचनाम्यानंतर मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला असला तरी जोवर वेदांता कंपनी नुकसान भरपाई देण्याबाबत लेखी हमी देत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा मनोजच्या कुटुंबीयांनी दिला आहे.

मनोज नाईक यांचे बंधू महेंद्र नाईक आणि मेहुणे पंडित खांडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की नुकसान भरपाई देण्याबाबत कंपनीने काहीच लेखी आश्वासन दिलेले नाही. मनोज यांची दोन्ही मुले लहान आहेत. वडिलांना अर्धांगवायूचा झटका आलेला आहे, तर भाऊ खासगी काम करत असल्याने कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. मनोज यांनी वीस  वर्षे या कंपनीत काम केले आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळणे गराजेचे आहे. जोवर कंपनी नुकसान भरपाईबाबत लेखी हमी देत नाही तोवर मृतदेह स्वीकारणार नाही, असे ते म्हणाले. मृतदेह हॉस्पिसियोत नेण्यासाठी आम्ही कोणीच पोलिसांना सही दिली नाही, असे खांडेकर यांनी सांगितले.