Thu, Nov 15, 2018 18:59होमपेज › Goa › खोतीगाव सरपंचाला पोलिसाची मारहाण

खोतीगाव सरपंचाला पोलिसाची मारहाण

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 12:08AMकाणकोण  ः प्रतिनिधी 

काणकोण तालुक्यातील खोतीगाव पंचायतीचे सरपंच दया गावकर यांच्या हाताचा चावा घेऊन त्यांना गेणू वेळीप (येडा, खोतीगाव) या काणकोण पोलिस स्थानकातील चालकाने मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. जखमी गावकर यांच्यावर  मडगावातील हॉस्पिसियो इस्पितळात उपचार सुरू आहेत.                                                                         

काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच दया गावकर व पोलिस  चालक  गेणू वेळीप एकाच वाड्यावर रहात असून बेकायदेशीर नळजोडणी प्रकरणातून शनिवारी हा  प्रकार घडला आहे. जखमी सरपंचांना  काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी मडगावातील हॉस्पिसिओत पाठवण्यात आलेे.   

दया गावकर हे काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांचे कट्टर समर्थक समजले जातात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, तसेच पक्षाचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी संध्याकाळी हॉस्पिसियो इस्पितळात जाऊन सरपंच दया गावकर यांच्या प्रकृतीची  विचारपूस केली. याप्रकरणी गेणू वेळीप यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.