Mon, Nov 19, 2018 09:01होमपेज › Goa › खारफुटीचे उद्यान बनतेय ‘फ्रेंडस् पाँईट’

खारफुटीचे उद्यान बनतेय ‘फ्रेंडस् पाँईट’

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jun 30 2018 11:08PMपणजी : पूजा  नाईक 

पाटो पणजी येथे   उभारण्यात आलेले खारफुटीचे उद्यान तथा ‘वॉक वे’   हे  युवा वर्गाच्या आकर्षणाचे  केंद्र ठरत आहे.  या उद्यानात  संध्याकाळच्या वेळी  विशेषतः युवावर्ग  मोठ्या प्रमाणात  वावरत असल्याने तो  ‘फ्रेंडस् पॉईंट’ बनत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातीलच नव्हेतर देशातील पहिले वहिले असलेले खारफुटीचे हे  उद्यान आबालवृध्द पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहे.

‘अमृत’ योजनअंतर्गत सुमारे 2.27 कोटी रुपयांचा निधी खर्चून पणजीतील रुआ द ओरेम खाडीवर  सुमारे 1100 चौरस मीटर्स क्षेत्रफळात उभारण्यात आलेल्या या अभिनव ‘वॉक वे’चे उद्घाटन नुकतेच नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते माजी आमदार तथा इमॅजिन पणजीचे  चेअरमन सिध्दार्थ कुंकळकर यांच्या हस्ते झाले. सदर ‘वॉक वे’ हे  देशातील एकमेव  खारफुटीचे उद्यान  असल्याने  ते नक्‍की, काय आहे हे पाहण्यासाठी लोकांची पावले ‘वॉक वे’ कडे वळत असल्याचे दिसून येत आहे.

या ‘वॉक वे’चे अजूनही काही काम शिल्‍लक आहे.  पर्यावरण रक्षणाचे  काम खारफुटीचे जंगल करते. या खारफुटीचे जतन करण्यासोबतच त्याची भावी पिढीला वेगळ्या पद्धतीने माहिती देण्याच्या उद्देशाने हा ‘वॉक वे’ उभारण्यात आलेला आहे. खारफुटीचे सुमारे 14 प्रकार  या ठिकाणी आहेत. या ‘वॉक वे’ वर संध्याकाळच्या वेळी जादा गर्दी दिसून येत आहेत. अनेक कॉलेज तरुण तरुणी या ठिकाणी भेटून  गप्पा मारताना दिसून येतात. त्यामुळे  युवा वर्गाच्या आकर्षणाचे ते केंद्र बनत आहेत. याशिवाय  संध्याकाळच्या वेळी काही ज्येष्ठ नागरिकही ‘इव्हनिंग वॉक’ साठीही येत असल्याचे दिसून येत आहे.संध्याकाळच्या वेळी इतर वेळेच्या तुलनेत जादा गर्दी दिसून येते.