होमपेज › Goa › शिवरायांच्या पुतळ्याची आज साखळीत प्रतिष्ठापना

शिवरायांच्या पुतळ्याची आज साखळीत प्रतिष्ठापना

Published On: Mar 04 2018 1:24AM | Last Updated: Mar 04 2018 1:10AMकेरी  :  वार्ताहर 

साखळी येथे शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ  पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. साखळी येथे शिव स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. रविवार  दि. 4  मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती दिनी छत्रपतींच्या पुतळ्याची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. शिवरायांचा पुतळा साखळीत आणताच शिवप्रेमींनी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम देसाई,  उपाध्यक्ष चंद्रशेखर देसाई, सचिव शिवानंद बाक्रे, उपसचिव दत्ताराम चिमूलकर,  खजिनदार सिद्धी परोब,  सहखजिनदार सुविधा पेडणेकर, राधिका सातोस्कर, विठ्ठल गावस, अनिल परब, मिलिंद नाईक, अतुल मळीक व इतर मान्यवर उपस्थित होते.

साखळी येथे तिथीप्रमाणे शिवजयंती सोहळ्यानिमित्त रविवार दि. 4 मार्च रोजी दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. 80 कलाकारांचा सहभाग असलेल्या कोल्हापूरच्या पथकाचा सांस्कृतिक कार्यक्रम असेल. 6.30 वाजता महाराजांच्या पुतळ्याची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येेणार आहे.

प्रमुख पाहुणे साखळीचे आमदार तथा सभापती डॉ. प्रमोद सावंत, सन्माननीय अतिथी म्हणून साखळीचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांची उपस्थिती असेल. दरम्यान, साखळी रवींद्र भवनतर्फे शिवजयंतीनिमित्त संध्याकाळी 7 वाजता शिवकालीन युद्धकलेचा धगधगता इतिहास याअंतर्गत तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी, पोवाडा असे कार्यक्रम  होणार आहेत.