Thu, Jun 27, 2019 00:15होमपेज › Goa › कोकणी नाट्यस्पर्धेत ‘आज्याची काणी’ प्रथम

कोकणी नाट्यस्पर्धेत ‘आज्याची काणी’ प्रथम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

कला अकादमीने आयोजित केलेल्या 42 व्या कोकणी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून नटरंग क्रिएशन्स, नार्वे-डिचोली यांनी सादर केलेल्या ‘आज्याची काणी’ या नाटकास 1,00,000 रुपयांचे प्रथम पारितोषिक तर एकदंत कला संघ, पंचवाडी-फोंडा यांच्या ‘सरण जळटना’ नाट्यप्रयोगास रु.75,000 चे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. अथश्री फोंडा यांच्या ‘चित्र रथ’ या नाटकाची रु.50,000 च्या तृतीय पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी रु. 25,000 ची उत्तेजनार्थ पारितोषिके सिध्दिविनायक युवक संघ, सांतिनेज-पणजी यांच्या ‘अस्तुरी थाव’ व नटराज क्रिएशन डोंगरी यांच्या ‘हे अशेंच’ या नाटकाने पटकावली.

उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मिलिंद बर्वे यांना ‘आज्याची काणी’ या नाटकासाठी प्राप्त झाले. दीपराज सातार्डेकर यांनी ‘सरण जळटना’ नाटकासाठी द्वितीय पारतोषिक संपादन केले. तृतीय पारितोषिक ‘चित्ररथ’ नाटकासाठी दिलीप देसाई यांना देण्यात आले.पुरुष गटात वैयक्तिक अभिनयासाठी संदेश पार्सेकर यांना ‘आज्याची काणी’ नाटकातील ‘भाटकार’ या भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले आहे. द्वितीय पारितोषिक निखील आडपईकर यांना ‘रातराणी’ नाटकातील ‘देवेन माहीमकर’ भूमिकेसाठी प्राप्त झाले. अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रे माल्कम डी कोस्टा-जुवांव (सरण जळटना), रुपेश जोगळे-पावल (नशिबाचो खेळ), शेखर उसगावकर-दोतोर कुय (तोंड घातील थंय मणगणे), तुळशीदास धोणशीकर-दासू (भूंय म्हजी भांगराची), व्यंकटेश गावणेकर-सुभाष बाबू (चित्ररथ), गजानन चोडणकर-सावंतवाडीकर (तोंड घालीत थंय मणगणे), हर्ष सामंत-छोटू (चित्ररथ) यांना प्राप्त झाली.

स्त्री गटात वैयक्तिक अभिनयासाठी हर्षला पाटील यांना ‘सरण जळटना’ नाटकातील ‘पार्वतें’ भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आली असून दीपा शेट्ये ‘आज्याची काणी’  नाटकातील ‘सावित्रीच्या’ भूमिकेसाठी द्वितीय पारितोषिक संपादन केले. स्त्री गटात अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रे स्नेहल ब्रिजेश शेट्य-मोनिका (अस्तुरी थाव), तन्वी देसाई-बार्बी  (चित्ररथ), निशा लोधिया-तें (हें अशेंच), अविता नाईक- मंजू (रोम रोम रोमँटीक), गीता जोशी-मन1 (मन मना अनमता), संजवी केरकर-प्रिया (तोंड घालीत थंय मणगणे), श्रेया गावकर-बाय (सरण जळटना) यांना प्राप्त झाली.

उत्कृष्ट नेपथ्यासाठीचे पारितोषिक सुर्या नाईक यांना ‘सरण जळटना’ नाटकासाठी प्राप्त झाले. ‘आज्याची काणी’ या नाटकाच्या प्रकाशयोजनेसाठी उमेश कारबोटकर यांनी पारितोषिक मिळविले तर वेषभूषेसाठीचे बक्षीस दीपा शेट्ये यांना ‘आज्याची काणी’ नाटकासाठी प्राप्त झाले आहे.उत्कृष्ट पार्श्‍वसंगीतासाठीचे पारितोषिक नरेंद्र वायंगणकर यांनी ‘आज्याची काणी’ या नाटकासाठी प्राप्त केले. रंगभूषेचे पारितोषिक खुशबू कवळेकर यांनी ‘चित्ररथ’ या नाटकासाठी संपादन केले. नाट्यलेखनासाठी प्रथम पारितोषिक दीपराज सातोर्डेकर यांना ‘सरण जळटना’ नाटकासाठी देण्यात आले आहे. सर्वेश नायक यांनी ‘आमची मूर्ती आमकां जाय’ नाटकासाठी द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी एकूण 24 प्रवेशिका विविध संस्थाकडून आल्या त्यातून 20 नाटके सादर झाली. या स्पर्धेचे परीक्षण आनंद मासुर, राजीव हेदे व श्रीमती ज्योती कुंकळकार या परीक्षक मंडळाने केले. पारितोषिक प्राप्त कलाकारांचे कला अकादमीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या पारितोषिक वितरण समारंभ दि. 20 एप्रिल 2018 रोजी सायं. 5 वा. कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात होणार आहे.

Tags : Goa, Goa News, Kannane Kani, wins, first prize, Konkani Natyasphardha  


  •