Mon, Nov 19, 2018 02:02होमपेज › Goa › काणका बँक दरोड्यातील आणखी दोघे गजाआड

काणका बँक दरोड्यातील आणखी दोघे गजाआड

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 2:43AM

बुकमार्क करा

म्हापसा : प्रतिनिधी 

इंडियन ओवरसीज बँकेच्या वेर्ला-काणका येथील शाखेवर दरोडा टाकून फरार झालेल्या दरोडेखोरांपैकी संशयित ईश्‍वरी दास व राजेश दास या दोघांना झिमतुल्ला (पाटणा-बिहार) येथून पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडे एक पिस्तूल सापडले आहे, अशी माहिती म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली. पाचजण आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागले असून तिघे अद्यापही फरार आहेत.

बिहार येथील झिमतुल्ला पोलिसांनी म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, ईश्‍वरी दास, राजेश दास यांंना अटक केली. म्हापसा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक योगेंद्र गारुडी पोलिस पथकासह संशयितांना आणण्यासाठी बिहारला रवाना झाले आहेत. या सशस्त्र हल्ल्यात आधी सहा दरोडेखोर होते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. नंतर रिक्षा चालक सातवा संशयित व चौकशीअंती आणखी एकजण या गुन्ह्यात गुंतला असल्याचे पोलिसांनी सांगितले.