Sun, Mar 24, 2019 16:52होमपेज › Goa › विदेशात नोकरीच्या आमिषाने युवकाला १ कोटीचा गंडा

विदेशात नोकरीच्या आमिषाने युवकाला १ कोटीचा गंडा

Published On: May 11 2018 1:36AM | Last Updated: May 11 2018 12:17AMपणजी : प्रतिनिधी  

ई-मेल तसेच फोनद्वारे नोकरीचे आमिष दाखवून 1 कोटी रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार हणजूण, बार्देश येथील आग्नेलो दोरादो या युवकाने सायबर गुन्हे विभागाकडे दाखल केली आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी  मार्क पियर्स, एडवर्ड अँड्र्यू व जॉर्ज या तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आग्‍नेलो दोरादो यांनी दिलेल्या तक्रारीत 10 ऑक्टोबर 2017 ते 18 एप्रिल 2018 या काळात  मार्क पियर्स, एडवर्ड अँड्र्यू व जॉर्ज नामक व्यक्‍तींनी आग्नेलो यांना ई-मेल तसेच फोनद्वारे विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्या बदल्यात त्याला  विविध बँक खात्यांमध्ये  जवळपास  1 कोटी 19 लाख 49 हजार 122 रुपये जमा करण्यास सांगितले. प्रत्यक्षात जेव्हा नोकरी मिळाली नाही तेव्हा आपण फसवले गेल्याचे समजताच आग्‍नेलो यांनी  पोलिसात तक्रार  दाखल केली.