Fri, Mar 22, 2019 07:42होमपेज › Goa › दोनापावला जेटी अपघातात जेट स्की ऑपरेटर ठार

दोनापावला जेटी अपघातात जेट स्की ऑपरेटर ठार

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 25 2018 12:11AMपणजी : प्रतिनिधी

दोनापावला जेटी येथे बुधवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास  जेट स्कीची जेटीच्या कठड्याला धडक बसून झालेल्या अपघातात जेट स्की (वॉटर स्कूटर) ऑपरेटर देवेंद्र भोसले (50,रा.बेती) हे जागीच ठार झाले. पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेट स्की ओपरेटर भोसले हे दोनापावला जेटीवर पाण्यात जेट स्की चालवत असताना त्यांचे नियंत्रण सुटले व जेटीच्या कठड्याला जेट स्कीची जोरदार धडक बसली.   यात  भोसले यांना जागीच मरण आले. या प्रकरणी पणजी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.