Wed, Jun 26, 2019 11:28होमपेज › Goa › बेकायदेशीर  मद्यसाठ्याची अबकारीमार्फत चौकशी सुरू

बेकायदेशीर  मद्यसाठ्याची अबकारीमार्फत चौकशी सुरू

Published On: Mar 24 2018 1:48AM | Last Updated: Mar 24 2018 1:48AMवाळपई : प्रतिनिधी

अडवई  येथे बेकायदेशीर  बनावट मद्यसाठा निर्मिती  करण्याच्या  आस्थापनावर  छापा टाकून वाळपईच्या अबकारी निरीक्षकांनी पाच लाखांचा माल जप्त केला होता. या  प्रकरणाबाबत  अबकारी आयुक्तांमार्फ त चौकशी सुरू आहे. यात गुंतलेल्यांवर कारवाई होणार, अशी माहिती अबकारी  कार्यालयातून सूत्रांनी दिली. अडवई गावापासून काही अंतरावर एका निर्जन स्थळी दि.12 मार्च रोजी  बेकायदेशीर बनावट मद्य  निर्मिती करण्याचा  प्रकार सुरू होता. याबाबत वाळपई अबकारी खात्याच्या अधिकार्‍यांना माहिती मिळताच त्यांनी धाड टाकून सुमारे पाच लाखांचा साठा जप्त केला होता.

सदर आस्थापनाला कायदेशीररीत्या टाळे ठोकण्यात आले होते. मात्र, सदर अस्थापनाचा मालक असल्याचे कोणीही पुढे न आल्याने अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला होता.  यात  गुंतलेल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदर धाडीत 71 बॉक्स  बनावट दारू साठा व  8 बँरल्समधून प्रत्येकी 200 लिटर बनावट दारूसाठा जप्त करण्यात आला होता.
 

tags : valapai, news,Investigating, illegal,alcohol,valapai,