Wed, Nov 21, 2018 11:38होमपेज › Goa › मासळीबद्दलच्या अफवांमुळे हस्तक्षेप करावा लागला : पर्रीकर 

मासळीबद्दलच्या अफवांमुळे हस्तक्षेप करावा लागला : पर्रीकर 

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 15 2018 11:59PMपणजी : प्रतिनिधी

खोट्या बातम्या अथवा अफवांमुळे गोमंतकीयांचे अधिक नुकसान होऊ शकते. राज्यात  आरोग्याला घातक मासळी येत असल्याच्या पसरलेल्या अफवांमुळे आपल्याला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. 

येथील आयनॉक्स थिएटरमध्ये  केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते आयटी धोरण घोषणेच्या कार्यक्रमानंतर पर्रीकर बोलत होते.

पर्रीकर म्हणाले की, विषारी रसायनयुक्‍त मासळीबद्दल उठलेल्या अफवांबद्दल आपण आधी शांत राहणेच पसंत केले होते. मात्र, या अफवांमुळे गोवेकरांनी मासळी खाणे बंद केले. गोवेकर मासळीविना कसा राहू शकतो? या विचाराने शेवटी आपल्याला परिस्थितीवर आपण लक्ष ठेवत असल्याचे जाहीर करावे लागले. 

पर्रीकर म्हणाले की, आधुनिक जगात वावरताना मोबाईलमुळे एका क्षणात माहितीचे आदान-प्रदान होत असले तरी या तंत्रज्ञानाचे काही दोषही आहेत. मोबाईल ‘कनेक्टीव्हीटी’मुळे मानवाला धोका असल्याचे बोलले जात असल्याच्याही अफवा आहेत. लोकांना मोबाईल हवे असतात मात्र मोबाईल टॉवर नको असतात.