Tue, Apr 23, 2019 01:36होमपेज › Goa › खाणबंदीवर तोडग्यासाठी वटहुकुमाचे निर्देश द्या

खाणबंदीवर तोडग्यासाठी वटहुकुमाचे निर्देश द्या

Published On: Jul 08 2018 1:43AM | Last Updated: Jul 08 2018 1:43AMपणजी : प्रतिनिधी

गोव्यातील खाणबंदीवर तोडगा म्हणून वटहुकूम जारी करण्याबाबत  केंद्र तसेच राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारे निवेदन  शनिवारी (दि.7) गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटतर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सादर करण्यात आले.फ्रंटचे नेते पुती गावकर यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने  दोनापावला येथील राजभवन येथे जाऊन ते सादर केले.

गावकर म्हणाले, राज्यातील सुमारे 3 लाख खाण अवलंबितांच्या वतीने खाण व्यवसाय सुरू व्हावा, या आशयाचे निवेदन राष्ट्रपतींना सादर करण्यात आले. खाण व्यवसायातून जमा होेणारा महसूल हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या व्यवसायातून 60 हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार प्राप्‍त होत आहे. 12 हजार ट्रक, 150 बार्ज तसेच 220 मशिन्स या खाण व्यवसायावर अवलंबून आहेत. खाण बंदीच्या निर्णयामुळे या व्यवसायावर प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे अवलंबून असलेल्या सुमारे 3 लाख अवलंबितांना  फटका बसत असल्याने त्यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आल्याचे गावकर यांनी सांगितले.