Wed, Jun 26, 2019 11:44होमपेज › Goa › सांडपाणी नदीत सोडणे आता दखलपात्र गुन्हा  

सांडपाणी नदीत सोडणे आता दखलपात्र गुन्हा  

Published On: Jul 28 2018 1:32AM | Last Updated: Jul 28 2018 12:23AMपणजी : प्रतिनिधी

मलनिस्सारण वाहिनीची जोडणी घेणे अनिवार्य असून ती सुविधा न घेता सांडपाणी नदीत सोडणे आता दखलपात्र गुन्हा ठरवण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत शुक्रवारी प्रश्‍नोत्तर तासात दिली. नुवेंचे आमदार विल्फ्रेड डिसा यांनी साळ नदीच्या प्रदूषणाबाबत विचारलेल्य प्रश्‍नाला उत्तर देताना वरील माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, साळ नदीच्या प्रदूषणावर चर्चा करून ती प्रदूषणमुक्‍त कशी करता येईल, यावर चर्चेसाठी अधिवेशनानंतर सर्व आमदारांची बैठक घेतली जाईल. नदीत सांडपाणी सोडणे ही गंभीर बाब  आहे. याबाबत तक्रार आल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

साळ नदी प्रदूषित झाली आहे. या नदीची सफाई करून, ड्रेजिंग करुन  हे प्रदूषण दूर करण्याची गरज आहे. 2014 साली साळ नदीत दूषित  तिसर्‍या आढळून आल्या होत्या. या तिसर्‍यांमध्ये  धातू  असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर अशा प्रकारची घटना समोर आलेली नाही. नदी पात्रांमध्ये सांडपाणी सोडणे हा गुन्हा आहे. त्यामुळे यापुढे मलनिःसारण वाहिनीची जोडणी न घेता सांडपाणी नदीत सोडणे आता दखलपात्र गुन्हा ठरवण्याचा विचार सरकार करत आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.