Wed, Apr 24, 2019 07:44होमपेज › Goa › ...तर पर्रीकरांवर अमेरिकेत उपचार

...तर पर्रीकरांवर अमेरिकेत उपचार

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 1:21AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर मुंबई येथील लीलावती इस्पितळात उपचार सुरू असून पंतप्रधान कार्यालयातर्फे आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे त्यांच्या प्रकृतीवर जातीने लक्ष ठेवले जात आहे. पर्रीकर यांच्यावर देशातील तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत.परंतु गरज भासल्यास अमेरिकेतूनही डॉक्टर  आणण्याची  तयारी सरकारने ठेवली आहे. तरीही अत्याधुनिक  उपचारांची  गरज भासल्यास परीर्र्कर यांना अमेरिकेत नेऊन उपचार करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत, अशी माहिती उपसभापती   मायकल लोबो यांनी सोमवारी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना  दिली.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा त्रास होत असून त्यांची प्रकृती सुधारेपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देता येणार नाही, असे इस्पितळ प्रशासनाने म्हटले आहे. स्थानिक खासगी वृतवाहिनीशी बोलताना लोबो म्हणाले की, केंद्र सरकारतर्फे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,  राज्यातर्फे आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे पर्रीकर यांच्यावरील उपचारासंदर्भातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.  

पर्रीकर यांचा आजार बरा होईल, असा विश्वास सर्वांनाच आहे.  ते उपचारांना बर्‍यापैकी प्रतिसाद देत आहेत. मुंबईतील लीलावती इस्पितळात त्यांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे.   त्यांना अन्य  इस्पितळात उपचारांसाठी न्यावे लागले तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व पर्रीकर यांच्या कुटुंबीयांशी बोलून योग्य तो निर्णय घेतला जाईल.