Tue, Apr 23, 2019 02:29होमपेज › Goa › शिरदोण, आजोशी-मंडूर, भाटी पंचायती ‘पीडीए’तून वगळणार 

शिरदोण, आजोशी-मंडूर, भाटी पंचायती ‘पीडीए’तून वगळणार 

Published On: Mar 22 2018 1:42AM | Last Updated: Mar 22 2018 1:42AMपणजी : प्रतिनिधी

‘ग्रेटर पणजी पीडीए’ तून सांताक्रुझ आणि सांतआंद्रे मतदारसंघातील शिरदोण, आजोशी-मंडूर आणि भाटी या तीन पंचायत क्षेत्रांना वगळण्यास चार सदस्यीय उपसमितीने मान्यता दिल्याची माहिती नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी दिली.

 ‘ग्रेटर पणजी पीडिए’तून सांताक्रुझ आणि सांतआंद्रे परिसर वगळण्याची मागणी करत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन आणि सभा घेतल्या होत्या. याबाबत निर्णय घेण्यासाठी अध्यक्ष सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली मुख्य नगर नियोजन विकासक राजेश देसाई, सदस्य सचिव पंडिता तसेच आमदार फिलीप नेरी रॉड्रग्रीस या चार जणांची उपसमिती नेमली होती.  या उपसमितीची पहिली बैठक बुधवारी सचिवालयात झाली असून त्यात लोकांच्या सर्व मागण्यांबाबत विचार करण्यात आल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. 

समितीच्या बैठकीत तीन पंचायतींना वगळण्याचा निर्णय नगर नियोजक मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे. अन्य सर्व पंचायतींच्या सरपंचांकडून आणि ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाची येत्या 10 एप्रिल रोजी होणार्‍या बैठकीत दखल घेण्यात येणार असून त्यावरही निर्णय घेण्यात  येणार आहे. हे सर्व निर्णय मंडळांकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर ‘ग्रेटर पणजी पीडीए’ तून सदर पंचायती वगळल्या जातील , असे सरदेसाई यांनी सांगितले.