Thu, Jun 20, 2019 00:33होमपेज › Goa › कॅनडातील चित्रपट महोत्सवात भारत ‘कंट्री फोकस’

कॅनडातील चित्रपट महोत्सवात भारत ‘कंट्री फोकस’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक द‍ृढ करण्याच्या द‍ृष्टीने कॅनडात होणार्‍या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताला फोकस कंट्री म्हणून गौरवण्यात येणार आहे, असे कॅनडाचे काऊंन्सिल जनरल जॉर्डन रिव्ज यांनी सोमवारी इफ्फीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

रिव्ज यांनी सांगितले की, कॅनडा आणि भारत हे दोन्ही देश एकत्र आले तर दोन्ही देशांतील सांस्कृतिक बाबींचे आदान-प्रदान होईल. कॅनडामध्ये भारतीय चित्रपटांसाठी व्यासपीठ उपलब्ध केले जाणार आहे. कॅनडाला बॉलीवूड टच दिला जाणार आहे. जगात कुठेही एवढी चित्रपट निर्मिती होत नाही जेवढी भारतात होते. भारतात चित्रपटांना चांगले मार्केट आहे, असेही रिव्ज म्हणाले.

चेंग पे पे म्हणाल्या की, आपण दंगल हा एक चांगला चित्रपट  पाहिला होता. या चित्रपटातील कलाकार आपल्याला अत्यंत आवडले. अधिक अ‍ॅक्शन  सिनेमे चीनमध्ये दाखविण्यात यावेत. परिषदेला चित्रपट निर्माते मीना शुम, अभिनेता थाई मा, अभिनेत्री चेंग पे पे, दिग्दर्शक डॉन मेकलर यांची उपस्थिती होती.