Tue, Mar 19, 2019 11:23होमपेज › Goa › गोवा शिपयार्डच्या ‘वेल्डिंग सेंटर’चे उद्घाटन

गोवा शिपयार्डच्या ‘वेल्डिंग सेंटर’चे उद्घाटन

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 12:04AMपणजी : प्रतिनिधी

गोवा शिपयार्ड लिमिटेडतर्फे 81 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या खास करून गोमंतकीय युवकांसाठीच्या वेल्डिंग प्रशिक्षण सेंटरचे उद्घाटन बुधवार दि. 14 फेब्रुवारी रोजी निवृत्त रिअर अ‍ॅडमिरल तथा जीएसएसएलचे अध्यक्ष शेखर मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले.

गोवा शिपयार्डच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत या वेल्डिंग केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. सदर केंद्र गोमंतकीय युवकांना समर्पित असल्याचे रिअर अ‍ॅडमिरल शेखर  मित्तल यांनी सांगितले.
यावेळी गोवा शिपयार्डचे अधिकारी व कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत 100 युवक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाणार असून 50 हजार रुपये शुल्क प्रशिक्षणासाठी निर्धारित आहे. मात्र गोवा शिपयार्डतर्फे सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत 45 हजार रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे.

जीएसएलने वास्को सरकारी आयटीआयला दत्तक घेतले असून या द्वारे उपकरणे,पुस्तके तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्‍तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त प्रशिक्षण आणि साधने पुरवली जाणार आहेत. सुमारे 300 विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होणार असून 85 हून अधिक प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.